भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेसि परता न कळे पैं शेषा

paresi parata na kale pain shesha

परेसि परता न कळे पैं शेषा । तो गौळिया अशेषा माजी हरी ॥ १ ॥ भाग्य पैं फळलें नंदाघरीं सये । यशोदा पैं माय परब्रह्माची ॥ २ ॥ गौळिये नांदती गोधनाचे कळप । त्यामाजि स्वरूप कृष्णमूर्ति ॥ ३ ॥ निवृत्तीचें ध्यान गोपाळ आमुचा । आतां जन्म कैचा भक्तजना ॥ ४ ॥