भजनी मालिका
← भजनांकडे परत

परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि

parapidak to amhan davedar | vishvin vishvambhar mhanauni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥ अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥२॥ तुका म्हणे माझी एकविध सेवा । विन्मूख ते देवा वाळी चित्तें ॥३॥