भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये

paramarthi to na mhanava apula | salagi dhakula helun naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥ पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥ तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥