भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं

paramaamruten rasana olavali | manachi rahili vrutti payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टी केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥ सकळ इंद्रियें जालीं ब्रम्हरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥ तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥