भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला

papiya chandala harikatha navade | vishayalagin avaden ganen tyala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥ ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥ वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥