भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि

papi mhanon tari athaviton pay | dosh bali kay tayahuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ ऐशा विचाराने घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥ एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥ तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥