भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरीदासांची

pap tap dainya jay uthauthin | jaliya bheti haridasanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरीदासांची ॥१॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥ तुका म्हणे मना जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥