भजनी मालिका
← भजनांकडे परत

पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते

panen jo khail baisoni kathesi | ghadel tayasi gohatya te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते ॥१॥ तमाखू ओढूनि काढिला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥ कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येईल जन्मा ॥२॥ जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥ जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥४॥