भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची

pandit vaidik athava dashagranthi | pari sari na pavati tukayachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥१॥ शास्त्रही पुराणें गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥ध्रु.॥ कर्मअभिमानें वर्ण अभिमानें । नाडले ब्राम्हण कलियुगी ॥२॥ तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भावं त्याचा पायीं विठोबाचे ॥३॥ अमृताची वाणी वरुशला शुध्द । करी त्या अशुद्ध ऐसा कोण ॥४॥ चहुं वेदांचे हें केले विवरण । अर्थहि गहन करूनियां ॥५॥ उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे । करुनी निराळे ठेविले ते ॥६॥ भक्ति ज्ञान आणि वैराग्य आगळा । ऐसा नाही डोळां देखियेला ॥७॥ जपतप यज्ञ लाजविली दाने । हरीनाम कीर्तनें करूनियां ॥८॥ मागें कवीश्वर झाले थोरथोर । नेले कलेवर कोणें सांगा ॥९॥ म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी । गेला तो विमानी बैसोनियां ॥१०॥