भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीये चोख रूपडें अशेख

pandhariye chokh rupaden ashekh

पंढरीये चोख रूपडें अशेख । भीमातीरीं देख पुण्यभूमी ॥ १ ॥ आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव । पुंडलिक भाव प्रगटला ॥ २ ॥ जन हें कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ । कीर्तनीं कळीकाळ दूरी ठाये ॥ ३ ॥ नाम हें विठ्ठल नलगे पैं मोल । नित्यता सकळ पांडुरंग ॥ ४ ॥ त्रिविधताप पाप तें जिंतील अमूप । मुरतील संकल्प एक्या नामें ॥ ५ ॥ निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी । सर्वत्र चराचरीं बोलियेलें ॥ ६ ॥