भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां

pandharichi vat pahen nirantar | nidhalavari kar thevuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥१॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥ तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥