भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत

pandharichi vari ahe majhe gharin | anik na karin tirthavrat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखीं नाम ॥२॥ नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ॥३॥