भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाईक तो जाणे पाईकींचा भाव । लागबग ठाव चोरवाट

paik to jane paikincha bhav | lagabag thav choravat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाईक तो जाणे पाईकींचा भाव । लागबग ठाव चोरवाट ॥१॥ आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥२॥ ऐसें जन केलें पाईकें पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बिळया तो नाईक त्रैलोकींचा ॥४॥