भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां साधन विठ्ठलकीर्तन

pahatan sadhan viththalakirtan

पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥