भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां हें बरवें झालें । कळों आलें यावरी

pahatan hen baraven jhalen | kalon alen yavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहातां हें बरवें झालें । कळों आलें यावरी ॥१॥ मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥ध्रु.॥ विसांवलें अंग दिसे । सरिसे सरिसे अनुभव ॥२॥ तुका म्हणे बरें झालें । देवें नेलें गवसूनि ॥३॥