भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहाणे परिसणे नामरूपी गेले

pahane parisane namarupi gele

रचनाकार: संत सोपान · अभंग
पाहाणे परिसणे नामरूपी गेले । निराकारी ठेले एकतत्वेसी ॥१॥ एकतत्वेसी हरि एक रूप माझा । भिन्न भाव दुजा नाही नाही ।।२।। संग परिकर सापडला आम्हा । सर्व आत्माराम पूर्णपणे ॥३॥ सोपान देव्हडे मन माजिवडे । ब्रह्मांड येवढे गिनियेले ॥४॥