भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी

padiliya tala | mag avagha nirvala | tethen koni bala | nahin yet konasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥ जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥ सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥ करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हणु लागती ॥३॥