भजनी मालिका
← भजनांकडे परत

निष्काम निश्चळ निश्चित स्वरुप

nishkam nishchal nishchit svarup

रचनाकार: संत सोपान · अभंग
निष्काम निश्चळ निश्चित स्वरुप । तेथे निर्विकल्प मन गेले ॥१।। ध्येय गेले ध्यान ध्याता माजी पूर्ण । आपण सनातन होऊनी ठेला ॥२॥ निर्गुण निरालंब निर्विकार फळ । आपणची सकळ होऊनी ठेला ॥३॥ सोपान जिव्हाळे मनाचे ते आळे । परब्रह्मा सावळे तयामाजी ॥४।।