भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरोपम गगनीं विस्तारलें एक

niropam gaganin vistaralen ek

निरोपम गगनीं विस्तारलें एक । अनंत हे ठक गणना नाहीं ॥ १ ॥ तो माय सांवळा यमुनेचे तटीं । कृष्ण तो जगजेठी यशोदेचा ॥ २ ॥ निराकृति आकार अंकुर गोमटे । तो गोपिकांसी भेटे भाग्ययोगें ॥ ३ ॥ निवृत्ति संपन्न कृष्णरूप ध्यान । गयनी तल्लीन नाम घेतां ॥ ४ ॥