भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरासि निर्गुण नुमटे प्रपंच

nirasi nirgun numate prapanch

निरासि निर्गुण नुमटे प्रपंच । विषयसुक साच नाहीं नाहीं ॥ १ ॥ तें रूप गोजिरें कृष्णमूर्ति ठसा । तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥ २ ॥ चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टें । नेतसे वैकुंठा नाम घेतां ॥ ३ ॥ निवृतिसी ध्यान सर्व जनार्दन । वैकुंठ आपण गोपीसंगें ॥ ४ ॥