भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरालंब सार निर्गुण विचार

niralamb sar nirgun vichar

निरालंब सार निर्गुण विचार । सगुण आकार प्रगटला ॥१॥ तें रूप सुंदर शंखचक्रांकित । शोभे अनंत यमुनातटीं ॥२॥ अपार उपाय आपणचि होय । सिद्धीचा न साहे रोळु सदा ॥३॥ सर्व हें घडलें कृष्णाचें सानुलें । घटमठ बुडाले इये रूपीं ॥४॥ सर्वसुखमेळे नामाकृती वोळे । सिद्धिचे सोहळे कृष्णनामीं ॥५॥