भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरालंब देव निराकार शून्य

niralamb dev nirakar shunya

निरालंब देव निराकार शून्य । मनाचेंही मौन हारपलें ॥ १ ॥ तें रूप साबडें शंखचक्रांकित । यशोदा तें गात कृष्णनाम ॥ २ ॥ मौनपणें लाठें द्वैत हें न साहे । तें नंदाघरीं आहें खेळेमेळें ॥ ३ ॥ निवृत्ति आकार ब्रह्म परिवार । गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥ ४ ॥