भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराकृती धीर नैराश्य विचार

nirakruti dhir nairashya vichar

निराकृती धीर नैराश्य विचार । परिपूर्ण साचार वोळलासे ॥ १ ॥ तें रूप रूपस सुंदर सुरस । तो पूर्ण प्रकाश गोकुळीं रया ॥ २ ॥ नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे । तो प्रत्यक्ष स्वरूपें नंदाघरी ॥ ३ ॥ निवृत्ति सादर निराकार अंकुर । साकार श्रीधर गोपवेष ॥ ४ ॥