भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी

namarupa godi brahmanda evadhi

नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी । द्वैताची परवडी हारपली ॥१॥ तें रूप सुंदर कॄष्णाचें सकुमार । सेविती निर्मळ भक्तराज ॥२॥ विराटे अनंत ज्या माजि विरतें । नव्हेचि पुरतें शेषादिकां ॥३॥ निवृत्ति लक्ष्मी गरूड चिंतिती । तयांचिये मति आकळ हरि ॥४॥