भजनी मालिका
← भजनांकडे परत

न सांगता तुम्हां कळो येते अंतर

na sangata tumhan kalo yete antar

न सांगता तुम्हां कळो येते अंतर। विश्वी विश्वंभर परिहारचि नलगे ।।१।। परि हे अनावर आवरिता आवडी। अवसान ते घडी पुरो एकी देत नाहीं ।।२।। काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं। पोटा आलों तईपासूनियां समर्थे ।।३।। तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ।।४।।