भजनी मालिका
← भजनांकडे परत

न साधे योगी न संपडे जगीं

na sadhe yogi na sampade jagin

न साधे योगी न संपडे जगीं । तें नंदाच्या उत्संगी खेळें रूप ॥ १ ॥ कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळीं । गोपिका सकळीं वेढियेला ॥ २ ॥ गाईचे कळप गोपाळ अमुप । खेळतसे दीप वैकुंठीचा ॥ ३ ॥ निवृत्ति दीपडें वैकुंठें साबडें । यशोदामाये कोडें चुंबन देत ॥ ४ ॥