भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळे तुमचें महिमान

na kale tumachen mahiman

न कळे तुमचें महिमान । सलगी पायीं जाण करितसे ॥१॥ कमाविलें जेणें तेंचि देई मज । येवढेंचि काज माझें आहे ॥२॥ जाणीवा शाहाणीव नको भरोवरी । नेणतें मी हरि पोसणें तुमचें ॥३॥ कर्ममेळा म्हणे जीवींची निजखूण । दाखवा चरण तुमचे देवा ॥४॥