भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग

musavalen ang | rangin melavila rang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥ एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥ सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥ तुका म्हणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥