भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता

mul karanen santan | nahin milat uchita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥ सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥ तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥