भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें

mukta hota pari balen jala baddha | gheuniyan chhand majhen majhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥ तुका म्हणे गेलें व्यर्थ वांयां विण । जैसा मृगसीण मृगजळीं ॥३॥