भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळाभास लहरी अपार

mrugajalabhas lahari apar

मृगजळाभास लहरी अपार । हा प्रपंच पसारा उदरीं जया ॥१॥ तें रूप वैकुंठ कृष्णरूपें खेळे । गोपाळांचे लळे यमुनातटीं ॥२॥ जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती । अनंतस्वरूपी एक दिसे ॥३॥ निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर । कृष्णाचि साचार बिंबलासे ॥४॥