भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां

min hen aisen kay jati | avaghad kiti pahatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥ नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥ अंधारानें तेज नेलें। दृष्टीखालें अंतर ॥२॥ तुका म्हणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥