भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान

mi majhen karit hoton jatan | bhitarilya choren ghetalen khan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥२॥ तुका म्हणे चोरटा चि झाला साव । सहज न्याय नाहीं तेथें ॥३॥