भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी

mhanavitan hari na mhane tayala | daravada padila dehamaji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥ आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निंश्चितीं कामरंगें ॥ध्रु.॥ नावडे ती कथा देऊळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥२॥ कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागविसी ॥३॥