भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले

mhanauni dharile pay | avo may viththale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥ आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें नाभिसे ॥ध्रु.॥ वाढली ते तळमळ चित्ता । शम आतां करावी ॥२॥ तुका म्हणे जीवीं वसे । मज नसे वेगळा ॥३॥