भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखता होय कासाविस

mayevin bal kshanabhari na rahe | na dekhata hoy kasavis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखता होय कासाविस ॥१॥ आणिक उदंड बुझाविती तरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥ नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥