भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायें मोकलिलें कोठें जावें बाळें । आपुलिया बळें न वांचे तें

mayen mokalilen kothen javen balen | apuliya balen na vanche ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायें मोकलिलें कोठें जावें बाळें । आपुलिया बळें न वांचे तें ॥१॥ रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥ भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥ तुका म्हणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥