भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी

mayecha marila angin nahin ghav | duhkhen tari lav dhadadhadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥ न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा वेडावली ॥ध्रु.॥ न पवे धांवणें न पवे चि लाग । न लगेची माग धरावया ॥२॥ भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । तरी त्यासी वाखा करीतसे ॥३॥ तुका म्हणे हाका मारूं नेदी देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥