भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण

mayalenkarant bhinna | nahin uttaracha sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥१॥ धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करूनि नवल । याचें बोलिलों ते बोल ॥२॥ तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥