भजनी मालिका
← भजनांकडे परत

मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती

mavilen maviti | nenon rasi padilya kiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥१॥ परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥ अवघ्यां अवघा काळ । वाटा वाहाती सकळ ॥२॥ तुका म्हणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥३॥