भजनी मालिका
← भजनांकडे परत

माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीती

maulichi chali lenkarache odhi | tayalagin kadhi pran priti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीती ॥१॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥ मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षण ॥२॥ तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥