भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारुनि कल्पना निवडिलें सार

maruni kalpana nivadilen sar

मारुनि कल्पना निवडिलें सार । टाकीलें असार फलकट ॥ १ ॥ धरिला वो हरि गोविलेंसे सर्व । विषयाची माव सांडीयेली ॥ २ ॥ पहाते दुभतें कासवी भरितें । नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ ३ ॥ निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार । सर्व ही विचार हरि केला ॥ ४ ॥