भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें

marun naye sarpa santanchiye drushti | hotil te kashti vyapakapanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥ एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥ नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य झाली ॥२॥ तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥