भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें

maranahi adhin rahilon maroni | mag kelen manin hoten taisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥ आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हां आम्हां ॥३॥