भजनी मालिका
← भजनांकडे परत

मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें

marana hatin sutali kaya | vicharen ya nishchayen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥ नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥ न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥ तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥