भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें

manin vase tyachen avade uttar | vate samachar ghyava aisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥ जातीचें तें झुरे येर येरासाठी । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥ भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरीजन प्राणसखे ॥३॥