भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनें हरीरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या

manen harirupin guntalya vasana | udas ya suna gauliyanchya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मनें हरीरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥ यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥ करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरी एकां लेंक ॥३॥ एक भाव नाहीं सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥ रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥ लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥ कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥