भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते

mande pur‍ya mukhen sangon jane mat | tondin lal hat choli rite

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥ बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥ तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥