भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचिये साक्षी झाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो

manachiye sakshi jhali sangon mat | sakal vruttant apala to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मनाचिये साक्षी झाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥ तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥ मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥ तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥