भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाची वासना मनेंचि नेमावी

manachi vasana manenchi nemavi

मनाची वासना मनेंचि नेमावी । सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥ १ ॥ आपेंआप निवेल आपेंआप होईल । विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥ २ ॥ साधितां मार्ग गुढ वासना अवघड । गुरुमार्गी सुघड उपरती ॥ ३ ॥ निवृत्ति वासना उपरति नयना । चराचर खुणा हरि नांदे ॥ ४ ॥